https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे गरीब व गरजू कुटुंबांना घरघंटी वाटप

0 80

उरण दि १२ (विठ्ठल ममताबादे ) : जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज, जिल्हा रत्नागिरी तर्फे दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमांतर्गत समाजातील गरिब व गरजू कुटुंबाना रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल कॉम्प्लेक्स उलवे,ता -पनवेल जिल्हा रायगड येथील पादुका व दर्शन सोहळाप्रसंगी घरघंटीचे वाटप करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर पनवेल महानगर पालिकेचे गटनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे सुपुत्र भाजप नेते परेश ठाकूर,काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,साई संस्थान वहाळचे संस्थापक रविशेठ पाटील ,शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे. एम म्हात्रे,जिल्हा परिषद सदस्य उमा मुंढे, संपादक मिलिंद खारपाटील, जेष्ठ पत्रकार राकेश खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल कॉम्पलेक्स उलवे येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजतर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. श्रीचे पादुकांचे आगमन नंतर गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन,उपासक दिक्षा दर्शन, पुष्पवृष्टि असे अनेक कार्यक्रम योवेळी संपन्न झाले. भव्य दिव्य असे मिरवणूकही यावेळी काढण्यात आले. श्री पादुकाचे आगमन झाल्यानंतर समाजातील दुर्बल व गरजू व्यक्तींना 25 घरघंटीचे वाटप करण्यात आले.

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा महाराष्ट्रात खूप मोठा भक्त वर्ग असून त्यांना माणणाऱ्यांचे संख्या खूप मोठी आहे. स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात अनेक विविध सामाजिक उपक्रम सूरु आहेत. कोरोना काळात मा. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 50 लाख रुपयाची आर्थिक मदत,मा. पंतप्रधान सहायता निधीसाठी बावन्न लाख रुपयांची आर्थिक मदत, रत्नागिरी जिल्हा पोलिस प्रशासनाला 10 लाखाचा धनादेश, रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला 15 लाखाचा धनादेश जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान च्या माध्यमातून करण्यात आले.जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचा मरणोत्तर देहदान हा उपक्रम जनमानसा मध्ये अत्यंत प्रभावीपणे यशस्वी होत आहे. सप्टेंबर 2016 ते जून 2022 या कालावधीत 26 मरणोत्तर देह समाजाच्या सेवेसाठी शासकीय मेडिकल कॉलेजना सुपूर्द करण्यात आले. ब्लड ईन नीड या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या रुग्णांना रक्तांची गरज भासते त्या त्या ठिकाणी हॉस्पीटल येथे जाउन आजपर्यंत 17720 रुग्णांना रक्त देउन त्यांचे प्राण वाचविले आहेत. महापूर, भूकंप आदि नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोना महामारीच्या काळातही अखंडपणे संस्थानतर्फे रुग्णसेवा सुरू होती. आज संस्थानतर्फे 37 रुग्णवाहिका 24 तास कार्यरत आहेत. या शिवाय समाज जागृती लोक प्रबोधन, व्यसन मुक्ती, संस्कृतीचे संरक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विविध उपक्रमही सुरू आहेत.महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यक्रमात त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी असते.तशीच मोठ्या प्रमाणात गर्दी पनवेल तालुक्यातील उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल कॉम्पलेक्स येथे पाहावयास मिळाली.जवळ जवळ 12000 ते 15000 भाविक भक्तांची येथे उपस्थिती होती.

सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांनचे सर्व पदाधिकारी सदस्य,जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडचे सर्व पदाधिकारी सदस्य,स्व स्वरूप संप्रदायचे सर्व पदाधिकारी, शिष्य वर्ग, उपासक यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.