रत्नागिरीत ८ जूनला सायकल रॅलीचे आयोजन
जागतिक सायकल दिनानिमित्त उपक्रम
रत्नागिरी : दरवर्षी 03 जून जागतिक सायकल दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये 3 जून ते 10 जून दरम्यान सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील काही आयकॉनिक जिल्ह्यांमध्ये सायकल रॅलीचे आयोजन केले जाणार आहे.
महाराष्ट्र क्रीडा विभागाच्या वतीने रत्नागिरी, पुणे, नागपूर व वर्धा असे चार जिल्हे आयकॉनिक जिल्हे म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र व जिल्हा प्रशासनाच्या वतीने 8 जून 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमपासून ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मारक पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीमध्ये सायकल चालवा व निरोगी रहा असा मंत्र रत्नागिरीकरांना देत जास्तीत जास्त नागरिकांनी रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.