https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मद्यपिंनो इकडे लक्ष द्या…१८ ते २० नोव्हेंबर…. ड्राय डे

0 84
  • विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
  • मतमोजणीच्या दिवशी २३ नोव्हेंबरला देखील मद्यविक्री ला बंदी


रत्नागिरी, दि.२९ : निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वा. पासून ते २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया समाप्त होईपर्यंत तसेच २३ नोव्हेंबर रोजी पाचही विधानसभा मतदार संघांची मतमोजणी होवून निकाल जाहीर होईपर्यंत जिल्ह्यातील सर्व देशी/विदेशी मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यात दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी मतदान व दि. २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी, रत्नागिरी ययांनी मुंबई मद्य निषेध अधिनियम, १९४९ चे कलम १४२ (१) नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन उक्त आदेशान्वये, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) मधील तरतुदींनुसार जिल्ह्यातील सर्व देशी / विदेशी मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती (नमुना एफएल-१. एफएल-२, एफएल-३. एफएल- ४ ( क्लब अनुज्ञप्ती), एफएल / बीआर-२, सीएल-२, सीएल-३, सीएल / एफएल/टिओडी-३, टिडी-१ इ.) दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वा. पासून, मतदानाचा आदला दिवस दि. १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस, मतदानाचा दिवस दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तसेच मतमोजणीचा दिवस दि. २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील २६३-दापोली, २६४-गुहागर, २६५-चिपळूण, २६६-रत्नागिरी आणि २६७-राजापूर या सर्व विधानसभा मतदार संघांची मतमोजणी होवून निकाल जाहीर होईपर्यंत बंद जिल्ह्यातील सर्व देशी/विदेशी मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.


या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ कलम ५४ व ५६ मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.