रत्नागिरी : “मस्त्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन” शिरगाव रत्नागिरी येथील दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सॉफ्ट स्किल डेव्हलएपमेंट : यशाची गुरुकिल्ली या विषयावर डॉ. रोटेरिअन संदीप करे यांनी “जागतिक युवा कौशल्य दिन औचित्यवर व्याख्यान दिले.
हा कार्यक्रम मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन आणि इंनेर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत केला होता.
श्री. संदीप करे यांनी सोप्या भाषेत काही निवडक संवाद कौशल्ये, व्यक्तिमत्व कौशल्ये, लोक कौशल्ये या सॉफ्ट स्किल्स आपल्या दैनंदिन जीवनात प्रभाविपणे कशी वापरावीत आणि त्याचा आपल्या व्यक्तिमत्व विकासात कसा उपयोग होतो हे उदाहरणासह समजावून सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य आणि रोटेरिअन डॉ. केतनकुमार चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल ची आवश्यकता उदाहरणासह विशद केली .केवळ डिग्री घेऊन किंवा पदवीधर होऊनआताच्या काळात नोकरी मिळणार नाही, मिळाली तरी टिकणार नाही, शाश्वत रोजगार संधी करिता काही आवश्यक कौशल्य अत्यावश्यक असून त्यामुळे कामातील उत्पादकता वाढवता येते . जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करत असताना युवकांनी शिक्षण घेत असतानाच किमान सहा सॉफ्ट्स स्कील म्हणजे आवश्यक कौशल्य शिकणे आवश्यक आहे असे सांगितले.
डॉ संदीप करे यांच्या मार्गदर्शन पर भाषणानंतर विद्यार्थ्यांनी फीडबॅक मध्ये कार्यक्रम त्यांना भविष्यात फायद्याचा राहील आणि आवश्यक कौशल्य शिकण्याबद्दल निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी रोटेरिअन सीताराम सावंत, इंनर व्हील क्लब च्या अध्यक्षा सौ. गांधी, सेक्रेटरी सौ. सुवर्णा चौधरी व खजिनदार सौ. श्रद्धा सावंत उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राकेश जाधव यांनी केले. कार्यक्रम आयोजनासाठी श्री. सुशील कांबळे, श्री. मिरजकर, श्री. रोहित बुरटे, कार्यालय अधीक्षक श्री. यादव यांनी कष्ट घेतले.
