- प्रत्यक्ष रुळावर धावण्यासाठी स्लीपर वंदे भारत सज्ज
मुंबई : हाय स्पीड वंदेभारत स्लीपर ट्रेन लवकरच प्रत्यक्ष मार्गावर धावणार आहे. या उच्च वेगाच्या तसेच अत्याधुनिक सुविधांनी सज्ज तसेच भारतीय बनावटीच्या ट्रेनचे वेग चाचणी यशस्वी झाली आहे. या चाचण्यांमुळे वंदे भारत (स्लीपर) गाड्या लवकरच रेल्वे ट्रॅकवर धावताना दिसणार आहेत. या गाड्यांमध्ये आधुनिक सुविधा असून, प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित प्रवास अनुभव घेता येणार आहे.
नवीन वर्षात उच्च गती गाड्यांची भेट प्रवाशांना मिळणार आहे कोटा विभागात वंदे भारत (स्लीपर) गाड्यांच्या यशस्वी चाचण्यांमध्ये १८० कि.मी. प्रति तासांचा उच्च वेग साध्य झाला आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या या नव्या श्रेणीतील गाड्यांमधून प्रवास अनुभवाचे स्वप्न साकार होणार आहे.
रेल्वे प्रवाशांना जगातील सर्वोत्तम प्रवास अनुभव मिळणार आहे.
याशिवाय, उच्च वेगामुळे प्रवास वेळ कमी होईल आणि प्रवाशांना वेळ आणि पैशाची बचत होईल. यामुळे देशातील रेल्वे प्रवासाची गुणवत्ता सुधारेल आणि देशाच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे
