https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरी-राजापूर दरम्यान  दिवा- सावंतवाडी एक्सप्रेसचे इंजिन बिघडले

0 186
  • जनशताब्दी, तेजस एक्सप्रेससह पाच गाड्यांना फटका

रत्नागिरी : दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसचे इंजिन ननिवसर ते आडवली दरम्यान बिघडल्याने बुधवारी सायंकाळी मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या जनशताब्दी तसेच तेजस एक्सप्रेस या महत्त्वाच्या गाड्यांना फटका बसला. यापैकी जनशताब्दी एक्सप्रेस तीन तासापेक्षा अधिक तर तेजस एक्सप्रेस दोन तास विलंबाने धावत होती. एकूण पाच गाड्यांचे वेळापत्रक यामुळे बिघडले.

या संदर्भात उपलब्ध माहितीनुसार दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी (10105) ही बुधवारी आधीच जवळपास तीन तास उशिराने धावत होती. मडगाव ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस बुधवारी सायंकाळच्या सुमारास आडवली स्थानकानजीक आली असता त्याचवेळी दिव्यावरून सावंतवाडीला जाण्यासाठी आलेल्या एक्सप्रेसचे इंजिन बिघडल्याने जनशताब्दीचा खोळंबा झाला. अडकून पडलेल्या दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला मार्गातून बाजूला करण्याच्या कामात जनशताब्दी एक्सप्रेस तीन तास रखडली.

या गाड्यांना बसला फटका

  • दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसचे इंजिन बिघडल्यामुळे आधीच विलंबाने धावत असलेली गाडी सावंतवाडीच्या दिशेने ५ तास ३९ मिनिटे इतकी उशिराने धावत होती.
  • इंजिन बिघडलेल्या या गाडी शिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस वरून त्रिवेंद्रमच्या दिशेने धावणारी 16345 ही नेत्रावती एक्सप्रेस एक तास 58 मिनिटे म्हणजे जवळपास दोन तास उशिराने धावत होती.
  • पनवेल ते सावंतवाडी दरम्यान धावणारी विशेष गाडी (01177) या घटनेमुळे सहा तास उशिराने धावत होती.
  • मडगाव ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान धावणारी 22120 ही तेजस एक्सप्रेस देखील एक तास 53 मिनिटे म्हणजे जवळपास दोन तास विलंबाने धावत होती.

Leave A Reply

Your email address will not be published.