रत्नागिरी : दादर ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या तुतारी एक्सप्रेसला स्लीपर श्रेणीचा एक जादा डबा तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्यांना सध्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातच सिंधुदुर्गमध्ये आंगणेवाडीची यात्रा असल्याने या मार्गावरील गाड्यांना गर्दी आणखीच वाढली आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन दादर ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या तुतारी एक्सप्रेसला (11003) या दररोज धावणाऱ्या गाडीला दिनांक 3 मार्च 2024 च्या फेरीसाठी तर सावंतवाडी ते दादर दरम्यानच्या (11004) परतीच्या फेरीसाठी दि 4 मार्च 2024 रोजी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.
हा बदल तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे कोकण रेल्वे कडून कळवण्यात आले आहे.