Ultimate magazine theme for WordPress.

Konkan Railway | कोकणातून धावणाऱ्या जबलपूर-कोइमतूर एक्सप्रेसच्या फेऱ्या डिसेंबरपर्यंत वाढवल्या

0 318
  • खेड, चिपळूण, रत्नागिरीसह कणकवली, कुडाळला थांबे

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्ग धावणारी जबलपूर ते कोईमतुर जंक्शन ही लांब पल्ल्याची गाडी आता डिसेंबर अखेरपर्यंत या मार्गावरून धावणार आहे.

मागील वर्ष दीड वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून मध्यप्रदेशमधील जबलपूर ते कोईमतुर लांब पल्ल्याची गाडी कोकण रेल्वे मार्गावरून धावत आहे. विशेष गाडी म्हणून ही गाडी चालवली जात आहे. मात्र या गाडीला लागत असलेल्या प्रतिसाद लक्षात घेऊन या गाडीच्या फेऱ्या आता डिसेंबर अखेरपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. यासाठी कोकण रेल्वे या गाडीचे पावसाळी यातील तसेच पावसाळ्याव्यतिरिक्त चे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे.
कोकण रेल्वे मार्ग धावरी ही गाडी 02198 / 02197 या क्रमांकानी चालवली जाते.

गाडी खालील स्थानकांवर थांबेल: नरसिंहपूर, गाडरवारा, पिपरिया, इतारसी जंक्शन, हरदा, खंडवा, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिवी, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, मूकांबिका रोड बायंदूर, कुंदापूर, उडुपी, मुळकी, मंगळुरू जंक्शन, कासरगोड, कन्नूर, वडकरा, कोझिकोड, तिरूर, शोरनूर जंक्शन आणि पालघाट.

२४ डब्यांच्या गाडीची अशी आहे कोच रचना

  • फर्स्ट एसी: १ डबा
  • दोन टियर एसी: २ डबे
  • तीन टियर एसी: ६ डबे
  • स्लीपर: ११ डबे
  • जनरल: २ डबे
  • एसएलआर: २ डबे
Leave A Reply

Your email address will not be published.