रत्नागिरी : गणपती विसर्जनानंतर मोठ्या संख्येने मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वे प्रशासनाने खेडमधून सहा विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. दि. 13,14,15 सप्टेंबरला सलग तीन दिवस या विशेष गाड्या खेड स्थानकातून रवाना होतील.
या गाड्या पनवेलपर्यंत धावतील.सकाळीं सहा आणि दुपारी सव्वा तीन वाजता खेड स्थानकातून या अनारक्षित गाड्या रवाना होतील. या गाड्यांना वीस डबे असतील. या गाड्यांना खेड ते रोह्यार्यंत सर्व स्थानकाला थांबे असतील. पुढे या गाड्या रोहा आणि पनवेल ला थांबतील. दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा तीन वाजता सुटणारी ट्रेन मात्र सीएसटी एम पर्यंत धावेल. या गाडीला पनवेल, दादर आणि ठाणे स्थानकातही थांबा असेल. या गाड्यांच्या घोषणेमुळे कोकण रेल्वेच्या खेड स्थानकात होणारी गर्दी कमी करण्यात यश येणार आहे.