https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मडगाव-मुंबई विशेष गाडी शुक्रवारी धावणार!

0 305

कणकवली, रत्नागिरी, चिपळूणला थांबे

रत्नागिरी : दिवाळी सणातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गे मडगाव जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी वनवे स्पेशल गाडी दिनांक १ नोव्हेंबर 2024 रोजी धावणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मडगाव जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (02052) ही एक मार्गी विशेष गाडी दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता मडगाव जंक्शनवरून सुटेल आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ती त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.

वनवे स्पेशल गाडीचे थांबे

थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण रोहा, पनवेल.

या वनवे स्पेशल गाडीला सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावत असलेल्या जनशताब्दी एक्सप्रेस प्रमाणे एक विस्टा डोम कोच, एसीचे चेअर कार 3, सेकंड सेटिंगचे 10 डबे तसेच जनरेटर कार व एस एल आर चा प्रत्येकी एक असे एकूण 16 डबे जोडण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.