उद्योगपती रतन टाटा यांना उरणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
उरण दि. १० (विठ्ठल ममताबादे ) : प्रसिद्ध उद्यापती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी मुंबईतील बीच कँडी रुग्णालयात बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्यांचे वय ८६ वर्षे होते. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने भारतातील राजकीय व सामाजिक उद्योग विश्वावर शोककळा पसरले आहे. दोनच दिवसापूर्वी ७ ऑक्टोबर रोजी ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले असता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रतन टाटा यांनी अखेरचा श्वास असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
देशाच्या विकासात,देशाच्या जडणघडण मध्ये महत्वाचे योगदान असलेल्या रतन टाटा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. उरण तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार गटाचे तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी श्रद्धांजली वाहिली. रतन टाटा साहेब महान व्यक्तिमत्त्व होते, महान रत्न होते. देशाच्या विकासात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.देश त्यांचे विचार कार्य कधीही विसरणार नाही. एका चांगल्या मार्गदर्शकाला, अष्टपैलू व्यक्तीमत्वाला आपण मुकलो.आज रतन टाटा आपल्यात नसले तरी त्यांचे विचार व कार्य या देशासाठी, सर्वांसाठी नेहमी आदर्श व प्रेरणादायी ठरतील व पुढील समाजाला एक नवी दिशा देतील असे मत व्यक्त करत परीक्षित ठाकूर यांनी उद्योगपती रतन टाटा यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, युवा अध्यक्ष समत भोंगले,शहराध्यक्ष तुषार ठाकूर,तालुका सरचिटणीस दिनेश पाटील, युवा अध्यक्ष अमर घरत आदींनी श्रद्धांजली वाहिली आहे.