दोन्ही खेळाडू उत्तराखंडसाठी आज रवाना होणार
रत्नागिरी : नुकत्याच शिर्डी येथे झालेल्या साऊथ झोन-२ शालेय सीबीएससी स्पर्धेत रत्नागिरीतील नवनिर्माण इंग्लिश मीडियम स्कूलमधील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर ओम साई मित्र मंडळ सभागृह साळवी स्टॉप नाचणे येथे प्रशिक्षण घेणारे सई संदेश सुवरे व भार्गवी सत्यविजय पवार या रत्नागिरीतील दोन सुवर्णकन्या ची निवड ९ ते १३ ऑक्टोबर २०२४ दरम्यान उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता झाली आहे. हे खेळाडू आज (सोमवारी) रोजी रत्नागिरीतून रवाना होतील. या खेळाडूंचे संघ प्रशिक्षक म्हणून प्रतीक पवार साऊथ कोरिया ब्लॅक बेल्ट फर्स्ट दान राष्ट्रीय प्रशिक्षक यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेले हे दोन्ही खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक राम कररा महिला प्रशिक्षिका शशी रेखा कररा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले हे यश संपादन केल्याने जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश्वर राव कररा, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये मुख्याध्यापक अरविंद पाटील, नवनिर्माण शिक्षण शिक्षण संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेटट्ये यांनी अभिनंदन केले आहे. दोन्ही खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.