https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

आरवली गडनदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला

0 223

आरवली : येथील गडनदीच्या पात्रात सोमवारी बुडून बेपत्ता झालेल्या २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी घटनास्थळापासून काही अंतरावर नदीपात्रात तरंगताना बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आढळून आढळून आला आहे.

नातेवाईक महिलेसोबत संगमेश्वर तालुक्यातील गड नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेला २१ वर्षीय तरुण प्रशांत प्रभाकर भागवत हा नदीपात्रात बुडून बेपत्ता झाला होता. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली होती. घटनेनंतर 24 तास उलटूनही नदीपात्रात बेपत्ता तरुणाचा शोध लागलेला नव्हता. स्थानिक ग्रामस्थ तसेच अनुभवी पाणबुड्यांच्या मदतीने त्याचे शोधकार्य सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.