रत्नागिरी तालुका व शहर बूथ कमिट्या बनविण्याचा काँग्रेसचा निर्धार

जिल्हा उपाध्यक्ष व रत्नागिरीचे प्रभारी शेकासन, शहराध्यक्ष शाहा व तालुकाध्यक्ष पाटील यांचा निर्धार

रत्नागिरी : रत्नागिरी शहर व तालुका काँग्रेसची सभा काँग्रेस भवन रत्नागिरी येथे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या अध्यक्षतेखाली व माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, जिल्हा उपाध्यक्ष व रत्नागिरीचे प्रभारी हारिस शेकासन व श्रीमती रुपाली सावंत महिला प्रदेश सरचिटणीस यांच्या उपस्थितीत पार पडली.

या सभेमध्ये शहराध्यक्ष रमेश कुमार शाहा व तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी आपल्या कामाचा आढावा सादर केला. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी संघटना वाढीसाठी बूथ कमिट्या बनविण्याचे आवाहन केले. तसेच सर्वानी एकजुट होऊन पक्ष वाढीचे काम करावे, असे सांगितले.

माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी कार्यकर्त्याना गटबाजी संपुष्टात आणण्याचे आवाहन करत पदाधिकारी व कार्यकर्त्यानी समन्वय साधून काम करावे, अशी सूचना केली.

यावेळी अविनाश लाड – जिल्हाध्यक्ष, रमेश किर – प्रदेश नेते, हारीस शेकासन – जिल्हाउपाध्यक्ष, रूपाली सावंत – महीला कांग्रेस प्रदेश सरचिटणीस विकास पाटील – तालुकाध्यक्ष रत्नागिरीरमेश शाहा – शहराध्यक्ष रत्नागिरी, बाळा मयेकर – माजी उपनगराध्यक्ष, दिपक राउत, काका तोडणकर, बंडू सावंत, शराफत वागले, आतिफ साखरकर, रफिक मुल्लाजी, नाथा आढाव, कल्पेश जाधव, बरकत काझी, ,प्रितम पिलणकर, राकेश चव्हाण, लक्षमीकांत मयेकर, शब्बीर भाटकर, पांडू शेठ कवितके उपस्थित होते.

सभेच्या शेवटी तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष रमेश कुमार शाहा व जिल्हा उपाध्यक्ष व प्रभारी हारीस शेकासन यांनी रत्नागिरी तालुका व शहरातील सर्व बूथ कमिट्या लवकरात लवकर बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE