कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस उद्घाटनासाठी मुंबईहून मडगावमध्ये दाखल

मडगावमध्ये शुभारंभाची तयारी; पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमधून करणार व्हीसीद्वारे उद्घाटन

मडगाव : देशभरातील पाच वेगवेगळ्या मार्गांवर वंदे भारत या स्वदेशी हाय स्पीड ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ मंगळवारी सकाळी १०.३० वाजता करण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या उद्घाटनासाठी आठ डब्यांची नवीकोरी वंदे भारत एक्सप्रेस मुंबईहून मडगाव ला रविवारी दाखल झाली आहे. महाराष्ट्रातील या पाचव्या वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभाची जोरदार तयारी गोव्यात जोरदार करण्यात आली आहे.

वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर

मुंबई ते रत्नागिरी – ₹ 1120
पनवेल ते रत्नागिरी- ₹1010

मुंबई सीएसएमटी ते कणकवली- ₹1365
मुंबई ते मडगाव- ₹1815
मुंबई सीएसएमटी – खेड – ₹ 880

मडगाव मुंबई  वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळवारी होणाऱ्या शुभारंभाची मडगाव स्थानकात करण्यात आलेली तयारी


22229 /22230 या क्रमांकासह कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे ऑनलाइन तसेच आरक्षण खिडक्यांवरील बुकिंग सोमवारी सकाळी सुरू झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात उत्सुकता असलेल्या अनेकांनी या गाडीच्या 28 पासून सुरू झालेल्या नियमित फेऱ्यांकरता आरक्षण करण्यास सुरुवात केली आहे.


मंगळवारी शुभारंभानंतर वंदे भारत एक्सप्रेसच्या नियमितफेऱ्या दिनांक २८ जूनपासून २०२३ पासून सुरू होत आहेत. पावसाळी वेळापत्रकानुसार मुंबई मडगाव मार्गावर सोमवार, बुधवार व शुक्रवारी ही गाडी धावेल तर मडगाव मुंबई मार्गावर मंगळवार गुरुवार व शनिवारी ही गाडी धावेल.
बिगर पावसाळी हंगामात शुक्रवार वगळून ही गाडी सहा दिवस कोकण रेल्वे मार्गावर धावेल.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE