देवरुख (सुरेश सप्रे ) : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट मुंबई -मडगाव-जनशताब्दी एक्सप्रेसला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर रोड रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा, यासाठी आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजीत पवार गट) नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी भेट घेवून निवेदन देत मागणी केली आहे.
यावर श्री यशवंतराव यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. यावेळी मंत्री महोदयांनी राजापूर रेल्वे स्टेशनला थांबा देण्याच्या मागणीवर सकारात्मकता दाखवून थांबा देण्यासाठी लवकरच कोकण रेल्वे अधिकारी वर्गाला बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले. यावेळी चिपळूण संगमेश्वरचे आ. शेखर निकम उपस्थित होते.
हेही वाचा : Konkan Railway | गणेशोत्सवासाठी दिवा-रत्नागिरी मार्गावर यंदा प्रथमच मेमू स्पेशल धावणार!












