रत्नागिरी : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रध्वजास रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने सलामी देण्यात आली.
या कार्यक्रमास मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.












