देवरूख (सुरेश सप्रे : चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील देवरुख शहर व साडवली परिसरातील व्यापारी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आमदार शेखर निकम यांनी सदिच्छा भेट देऊन दीपावली व लक्ष्मी पूजननिमित्त शुभेच्छा दिल्या.
शहरातील शुभेच्छा फेरीदरम्यान आमदार शेखर निकम याच्यासमवेत आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भव्य अशी शुभेच्छा फेरी काढण्यात आली. सर्व व्यापारी बंधूना शुभेच्छा देत असताना आमदार शेखर निकम हे त्यांच्या व्यापाराविषयी विचारपूस करत होते तसेच दुकानातील वस्तूंचे कौतुकसुद्धा करत होते.
व्यापारी देखील आमदार शेखर निकम यांचे आदराने स्वागत करत होते व त्यांचे काळजीपोटी तब्बेतीची विचारपूस करत होते. सर्व कार्यकर्ते नवयुवक, लहान मुलं याच्यामध्ये उत्साहाचे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येकजण आपल्या आवडत्या लोकप्रतिनिधी सोबत फोटो काढण्यासाठी सरसावत होते. तेवढ्याच आवडीने आमदार शेखर निकम त्यांना वेळ देत त्यांसोबत फोटो काढत होते त्यांना शुभेच्छा देत होते.
ही सर्व नजाकता सर्व मार्केटमधील जनता पाहत होती व एक आदर्श कार्यकुशल प्रतिनिधी आपल्या मतदार संघाला मिळाला त्याचा आनंद दीपावली निमित्त शुभेच्छा देताना सर्वजण लुटत होते व त्यातून एक वेगळंच समाधान सर्व जनतेच्या डोळ्यातून दिसत होते.

यावेळी महाविकास आघाडीचे बाळु ढवळे, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, पंकज पुसाळकर, संतोष लाड, बंडया बोरुकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष बाबा सावंत, मुन्ना थरवळ, बाबा दामूष्टे, सौ. वेदा फडके, निखिल कोळवणकर, नितीन हेगशेट्ये, अमित जाधव, मंगेश कदम,बंडू जाधव, जितू शेट्ये, निलेश भुवड, राष्ट्रवादी युवक आघाडीसह महाविकास आघाडी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.














