पालकमंत्री उदय सामंत नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी

रत्नागिरी: गुढीपाडव्याच्या निमित्ताने रत्नागिरी शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपला सहभाग दर्शवला.

बुधवारी नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी शहरात विविध देवस्थाने, संस्था, संघटना यांच्यामार्फत शोभायात्रा काढण्यात आल्या. नाणीज येथील नरेंद्र महाराज संस्थान, रत्नागिरीतील श्रीदेव भैरी देवस्थान, श्री विठ्ठल मंदिर आदींनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रत्नागिरी शहरातून नववर्ष स्वागत यात्रा काढली.

या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी श्री देवभैरीची पालखी खांद्यावर घेऊन शोभायात्रेला शुभेच्छा दिल्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE