रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या ‘इंद्रधनुष्य’ या कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार ह. भ. प. कीर्तनचंद्रिका रोहिणी माने परांजपे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला विशेष संवाद शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता प्रसारित होणार आहे.
या विशेष मुलाखतीत रोहिणी ताईंच्या कीर्तन प्रवासाचा उलगडा, कीर्तन क्षेत्रातील त्यांचे अनुभव आणि वाटचाल याबरोबरच समाजासमोरच्या विविध प्रश्नांवर त्यांनी दिलेला महत्त्वपूर्ण संदेश ऐकायला मिळणार आहे. त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधनाची भूमिका कशी जपली जाते, याविषयीही त्या मनमोकळेपणाने व्यक्त झाल्या आहेत.
या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.
हा कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ११४३ किलोहर्ट्झ मध्यमलहरी आणि १०१.५ मेगाहर्ट्झ एफ.एम. वाहिनीवरून ऐकता येईल. तसेच न्यूजऑनएअर मोबाईल ॲपवरही हा कार्यक्रम उपलब्ध असेल.
कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर AIR Ratnagiri 1248 या यूट्यूब चॅनलवर तो श्रोत्यांना पुन्हा ऐकण्यासाठी उपलब्ध होणार आहे.











