मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ

पनवेल : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा (पनवेल), रायगड  येथे मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गासह महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन गुरुवारी सकाळी करण्यात आले. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते.

यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा.श्रीरंग बारणे, खा. सुनील तटकरे, आ. प्रशांत ठाकूर आ. महेश बालदी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उद्योग मंत्री उदय सामंत तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समवेत इंदापूर ते लांजा तालुक्यातील वाकेड दरम्यान होणाऱ्या हवाई पाहणी दौऱ्यासाठी रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE