वहाळ येथील साई मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी

उरण (विठ्ठल ममताबादे) : भाविकांचे श्रद्धास्थान, प्रतिशिर्डी म्हणून परिचित असलेले वहाळ येथील श्री साई मंदिर रामनवमी निमित्त गजबजलेले होते. रामनवमीनिमित वहाळ येथील साई मंदिरात भाविक भक्तांची खूप मोठी गर्दी होती. भक्तांनी रांगेत उभे राहून साई दर्शन घेतले.

सकाळी 6 वा. काकड आरती, 6:30 वा. बाबांचे मंगलस्नान, सांयकाळी 6 वा. धुपारती, 6.30 वा जितु भाई सांस्कृतिक भजन मंडळ जिते यांचे यांचे संगीत भजन,सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत महाप्रसाद आदी विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम विविध उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाले. यावेळी साईमंदिर वहाळचे संस्थापक रविशेठ पाटील, रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE