उद्योग मंत्री उदय सामंतांना घेऊन येणारी बोट मांडवा जेटीला धडकली

अलिबाग : रायगड किल्ल्यावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनासाठी अलिबागला जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यासाठी निघालेल्या उद्योग मंत्री उदय सामंत यांची बोट रायगड जिल्ह्यातील मांडवा जेटीला धडकण्याची दुर्घटना सोमवारी घडली. दुर्घटना वेळी ना. उदय सामंत यांच्यासोबत छत्रपती संभाजी राजे देखील होते. हे दोघेही या दुर्घटनेतून बचावले आहेत.

रायगड किल्ल्यावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनासाठी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे छत्रपती संभाजी राजे यांना सोबत घेऊन अलिबागला जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यासाठी निघाले होते. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून एका स्पीड बोटीने ते अलिबागला येण्यासाठी निघाले होते. ही स्पीड बोर्ड मांडवा जेटीवर आली त्याच वेळी ती जेटीच्या खालील खांबांना धडकली. मात्र, बोटीच्या कॅप्टनने वेळेस नियंत्रण मिळवल्यामुळे नियंत्रण सुटलेली बोट स्थिरावली. या दुर्घटनेवेळी बोटीतून प्रवास करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली मात्र. चालकाने स्पीड बोटीवर नियंत्रण मिळवल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE