संगमेश्वरमधील पत्रकार संदेश सप्रे यांचे अकाली निधन

संगमेश्वर दि.५ : संगमेश्वर तालुक्यातीलहरहुन्नरी व तडफदार पत्रकार व दै. सकाळचे संगमेश्वर तालुका प्रतिनिधी व ‘संगमेश्वर न्युज’चे संपादक संदेश ( मन्या ) सुरेश सप्रे यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

संदेश सप्रे हे पुण्यातुन नियमित तपासणी आटपून पनवेल येथे आले होते. आज सकाळी ९ च्या सुमारास अचानक डोके दुखत असलेने त्यांना त्वरित पनवेल येथिल अष्टविनायक हाँस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांचे ब्रेन हँमरेज (मेंदूत प्रचंड रक्तस्राव) झालेने दुपारी ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.


त्यांच्या पश्चात आई. पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.. त्याच्या अचानक जाणाने संगमेश्वर तालुक्यासह पत्रकार क्षेत्रावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE