बारमाही वाहणारी जगबुडी नदी लागली ; खेडवासीयांपुढे पाणीटंचाईचे संकट

खेड : बारमाही वाहणार्‍या भरणे जगबुडी नदीपात्रात सद्यस्थितीत पाण्याचा खडखडाट निर्माण झाला आहे. रणरणत्या उन्हामुळे जलस्त्रोत आटत चालल्याने नदीपात्र कोरडे पडू लागले आहे.

तालुक्यात उष्म्याने कहर केला आहे. कडक उन्हामुळे नदी-नाले कोरडे पडत आहेत. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. उपलब्ध जलस्त्रोत आटत चालल्याने ग्रामस्थ टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेत आहेत. भरणे येथील जगबुडी नदीपात्रात निर्माण झालेल्या खडखडाटामुळे पाणीटंचाईचे नवे संकट उभे ठाकण्याची चिन्हे निर्माण झाले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE