रत्नागिरी : उन्हाळी हंगामात कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांबरोबर या आधीच काही समर स्पेशल गाड्या जाहीर केलेल्या असताना त्यामध्ये आता आणखीन दोन गाड्यांची भर पडली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर जाहीर करण्यात आलेल्या नव्या समर स्पेशल गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी (01455/01456) ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक 15 एप्रिल ते ३ जून 2023 या कालावधीत दर शनिवारी रात्री एक वाजून दहा मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी ती गोव्यात कर्मळीला दोन वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल. करमाळी येथे लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर धावताना ही गाडी दि. 15 एप्रिल ते ३ जून 2023 या कालावधीत दर शनिवारी सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून 45 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस ला पोहोचेल.

एलटीटी - करमाळी समर स्पेशलचे थांबे
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल.
दुसरी समर स्पेशल विशेष गाडी पुणे ते एर्नाकुलम दरम्यान सुपरफास्ट म्हणून धावणार आहे. ही गाडी 01449/01450) दिनांक 13 एप्रिल ते 25 मे 2023 या कालावधीत आठवड्यातून एकदा धावणार आहे. या कालावधीत पुणे येथून ही गाडी दर गुरुवारी सायंकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ती सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी एरणाकुलमला पोहोचेल एरणाकुलम ते पुणे दरम्यान धावताना ही गाडी दिनांक 14 एप्रिल ते 26 मे या कालावधीत दर शुक्रवारी धावेल. ही गाडी एरणाकुलम येथून रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी पुण्याला पोहोचेल.
पुणे-एरनाकुलम समर स्पेशलचे थांबे
ही गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरु जंक्शन, कासरगोड, कन्नूर, थलास्सेरी, कोझिकोडे, तिरूर, शोरनूर जंक्शन आणित्रिसूर या स्टेशनवर थांबणार आहे.














