चिपळूणसह राजापूर तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपले

रत्नागिरी : हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार काही ठिकाणी वाऱ्याचा पाऊस कोसळला. राजापूर तालुक्यात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने तडाखा दिला. दोन दिवसात राजापूर तालुक्यात पूर्वत असेच पश्चिम हे दोन्ही भाग अवकाळी पावसाने व्यापले. चिपळूणमध्ये देखील शनिवारी अवकाळी पाऊस झाला. रत्नागिरी शहर परिसरात पाऊस झाला नाही. मात्र, विजेचा लपंडाव सुरू होता

राजापूर तालुक्यात वादळी पावसामुळे घरावर कोसळलेले झाड.

राजापूर तालुक्यात जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शुक्रवारी विद्युत वाहिन्यांवर झाड कोसळून विद्युत पुरवठा खंडित झाला तर तालुक्यातील सावडाव येथे घरावर झाड कोसळल्याने अंशतः नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात शनिवारी अवकाळी पाऊस झाला मात्र , मात्र तेथे मोठे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली नाही. राजापूर तालुक्यात मात्र पावसाचा आलेल्या वाऱ्यामुळे विद्युतारा तुटल्याने पंडित वीजपुरवठ्याला ग्राहकांना सामोरे जावे लागले. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कोसळलेले विद्युत खांब उभे करून विद्युत पुरवठा सुरळीत केला.

शुक्रवारी सायंकाळी हवामान खात्याने रत्नागिरी सह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट असा पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त केली होती. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE