रत्नागिरी : गुजरातमधील उधना ते कोकण रेल्वे मार्गे मंगळुरू दरम्यान धावणाऱ्या समर स्पेशल गाड्या रेल्वेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. या गाड्या १२ एप्रिलपासून सुरू होणार असून त्या जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालवल्या जाणार आहेत.
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरु जं. साप्ताहिक स्पेशल उधना जंक्शन येथून दिनांक 12 एप्रिल ते ७ जून 2023 या कालावधीत रात्री 20:00 वाजता सुटून मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी 19:40 वाजता पोचणार आहे.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. मंगळुरु जंक्शन येथून साप्ताहिक स्पेशल हेअर गाडी रात्री 21:10 वाजता गुरुवार 13/04/2023, 20/04/2023, 27/04/2023, 04/05/2023, 11/05/2023, 18/05/2023, 25/05/2023, 1 जून 2023 आणि ०८/०६/२०२३ या तारखांना सुटेल. ही ट्रेन उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी 21:05 वाजता पोहोचणार आहे.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. विशेष गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम येथे थांबेल. , करमाळी, मडगाव जंक्शन, कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल स्टेशन या स्थानकांवर थांबे घेणार आहे.















