लोटे एमआयडीसी क्षेत्रात लवेल येथील अपघात ; मृत तरुण मुंबईच्या कांदिवली उपनगरातील
चिपळूण : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोटे एमआयडीसी क्षेत्रात लवेल येथे मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाताना अचानक बैल आडवा आल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून तो रस्त्यावर कोसळला. याचवेळी वेगाने आलेल्या टँकरखाली सापडून दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू झाला. हा अपघात मंगळवार दि.१८ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात मनीष मनोहर महाले ( ३८ रा. कांदिवली- मुंबई) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुंबई गोवा महामार्गावरून मनीष मनोहर महाले (३८ रा. कांदिवली मुंबई) हा तरुण दुचाकीने महामार्गावरून प्रवास करत होता. अचानक त्याच्या दुचाकीसमोर आडवा आलेल्या बैलाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावर कोसळली. त्याचवेळी भरधाव वेगाने चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या टँकरखाली सापडून मनीष यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
या अपघाताचा अधिक तपास खेड तालुक्यातील लोटे येथील पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस करीत आहेत.














