देवरूख नगर पंचायतीस सन्मानचिन्ह आणि दहा कोटी रुपयांचे बक्षिस
देवरूख- (सुरेश सप्रे) : महाराष्ट्र राज्यातील शहर सौंर्दय स्पर्धेत नगरपंचायत विभागात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नगर पंचायतीला राज्यात
द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून १०कोटीचे बक्षीस मिळाले आहे.

मुंबई येथे नगरविकास दिनाचे औचित्य साधून आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या उपस्थितीत शहर सौदर्यकरण स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा पार पडला. यामध्ये देवरुख नगरपंचायतीस राज्यात नगरपंचायत विभागात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
सन्मानचिन्ह आणि दहा कोटी रुपये असे या बक्षिसाचे स्वरुप आहे. देवरुख नगराध्यक्षा सौ. मृणाल शेटये, मुख्याधिकारी चेतन विसपुते, उपनगराध्य वैभव कदम, यांनी हा पुरस्कार स्विकारला. त्यावेळी नगरसेवक संतोष केदारी, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेटये हे उपस्थित होते.
देवरुख नगरपंचायतीला शहर सौंदर्यकरण स्पर्धेमधे राज्यात नगरपंचायत विभागात द्वितीय क्रमांक मिळाल्याने नगरपंचायतपदाधिकारी व कर्मचारी यांचेवर सर्वत्र अभिनंदन वर्षाव करण्यात येत आहे.
नगर पंचायतीचे नियोजन व सर्व नगरसेवक. पदाधिकारी. कर्मचारी यांचे सह शहरातील जनतेने केले सहकार्य यामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला, अशी प्रतिक्रीया मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी दिली.














