ईद व अक्षय्य तृतीयेनिमित्त सांगवे येथे शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सामाजिक कार्यकर्ते मुबारक व सुलतान मालगुंडकर यांच्यातर्फे आयोजन

देवरूख (सुरेश सप्रे ) : रमजान ईद व अक्षय तृतियेनिमित्त फसणट- सांगवे गावातील सामाजिक कार्यकर्ते मुबारक व सुलतान मालगुंडकर यांचे सौजन्याने सांगवे-फणसट गावातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन सांगवे ग्रामपंचायतीत करण्यात आले होते.

या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात आरोग्य तपासणी रत्नागिरीचे प्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी डॉ. नियाज बोदले व प्राथमिक आरोग्य केंद्र धामापूरचे सर्व डाँक्टर व कर्मचारी वर्गाने केले तर नेत्र चिकित्सा लायन्स क्लब रत्नागिरी चे नेत्रतज्ञ डॉ. सुर्यवंशी व डॉ. सावंत केली.

शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व डॉक्टर व धामापूर केंद्राचे कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सांगवे-फणसट ग्रा. प.च्या सरपंच दुर्वा शेलार व पोलिस पाटील विजय शेलार यांनी आभार मानले..

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE