पुणे-रत्नागिरी समर स्पेशल एक्सप्रेसची दुसरी फेरी आज

रात्री८ वाजून ५० मिनिटांनी रत्नागिरीसाठी सुटणार

रत्नागिरी : उन्हाळी सुट्टीच्या हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल गाड्या या प्रचंड गर्दीसह धावत आहेत. मध्य रेल्वेने जाहीर केलेली रत्नागिरी – पनवेल अनारक्षित साप्ताहिक स्पेशल आज ११ मे पासून धावणार आहे. रात्री 8 वाजून 50 मिनिटांनी ही गाडी रत्नागिरी साठी सुटणार आहे.


०११३१/०११३२ क्रमांकाची पुणे- रत्नागिरी अनारक्षित साप्ताहिक स्पेशल दर गुरुवारी धावणार आहे. ११ , १८ , २५ मे रोजी धावणारी स्पेशल पुणे येथून रात्री ८.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० वाजता रत्नागिरी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात दर शनिवारी १३ , २० , २७ मे रोजी धावणारी स्पेशल रत्नागिरी येथून दुपारी १ वाजता सुटून त्यादिवशी रात्री ११.५५ वाजता पुणे येथे पोहोचेल. २२ डब्यांची स्पेशल लोणावळा , कल्याण , रोहा , माणगाव , वीर , खेड , चिपळूण , सावर्डे , आरवली , संगमेश्वर आदी स्थानकात थांबेल.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE