सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उद्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार!

रत्नागिरी दि. २९ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री पालघर व सिंधुदूर्ग रविंद्र चव्हाण हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या टप्पानिहाय आहे कामाची पाहणी करणार आहेत.

मंगळवार 30 मे 2023 रोजी सकाळी 10.30 ते 11.00 वाजता मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 8 तळगाव ते वाकेड या 35 कि.मी. ची पाहणी. सकाळी 11.00 ते 12.00 वाजता मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 7 वाकेड ते कांटे या 51 किमी ची पाहणी. दुपारी 12.00 ते 01.00 वाजता मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 6 कांटे ते आरवली या 40 कि.मी. ची पाहणी. दुपारी 01.00 ते 02.00 वाजता मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 5 आरवली ते चिपळूण या 25 किमी ची पाहणी. दुपारी 02.00 ते 03.00 वाजता चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 03.00 ते 03.30 वाजता मुंबई-गोवा महामार्ग चिपळूण ते परशुराम घाट या 11.40 कि.मी. ची पाहणी. दुपारी 03.30 ते 04.15 वाजता मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 4 परशुराम घाट ते कशेडी घाट या 42.30 किमी ची पाहणी. दुपारी 04.15 ते 05.00 वाजता मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 3 कशेडी घाट ते भोगाव खुर्द या 13 किमी ची पाहणी.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE