Konkan Railway| अहमदाबाद-मंगळुरू मार्गावर ९ जूनपासून साप्ताहिक विशेष ट्रेन

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दिनांक 9 जून पासून साप्ताहिक विशेष गाडी सोडली जाणार आहे. या गाडीच्या फेऱ्या दिनांक 24 जून पर्यंत चालवल्या जाणार आहेत.

या संदर्भात कोकण ठाकरे कडून प्राप्त माहितीनुसार टगाडी क्रमांक ०९४२४ अहमदाबाद – मंगळुरू जं. ही स्पेशल फेअर साप्ताहिक स्पेशल शुक्रवार, ०९/०६/२०२३, १६/०६/२०२३ आणि २३/०६/२०२३ रोजी अहमदाबाद येथून १६:०० वाजता सुटेल आणि ट मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी 19:40 वाजता पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०९४२३ मंगळुरु जंक्शन – अहमदाबाद साप्ताहिक स्पेशल फेअर गाडी मंगळुरु जंक्शन येथून सुटेल. शनिवारी, 10/06/2023, 17/06/2023 आणि 24/06/2023 रोजी 21:10 वाजता. ट्रेन अहमदाबादला तिसऱ्या दिवशी 01:15 वाजता पोहोचेल.

कोणकोणत्या थांब्यांवर थांबणार गाडी

ही गाडी नडियाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, वसई रोड, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, उडुपी आणि सुरतकल स्थानकावर थांबे घेणार आहे.

या विशेष गाडीला एकूण 22 एलएचबी कोच असतील. यात दोन टायर एसी – 03 कोच, इकॉनॉमी थ्री टायर एसी – 12 कोच, स्लीपर – 03 कोच, जनरल – 02 कोच, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01 यांचा समावेश आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE