रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे सुरतजवळील उधना ते मंगळुरु जंक्शन अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी साप्ताहिषक विशेष गाडी आज दि. 28 जूनपासून सुरु झाली आहे. ही गाडी पुढील दोन महिने म्हणजे 30 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.
या संदर्भात कोकाण रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्र. 09057 उधना जं. – मंगळुरू जं. उधना जंक्शन येथून साप्ताहिक विशेष सुटेल. 28 जून 2023 ते 30 ऑगस्ट 2023 पर्यंत दर बुधवारी 20:00 वाजता. ट्रेन मंगळुरू जंक्शनला दुसर्या दिवशी 18:30 वाजता पोहचणार आहे.
गाडी क्र. 09058 मंगळुरु जं. – उधना जं. मंगळुरु जंक्शन येथून साप्ताहिक विशेष सुटेल. 29 जून 2023 ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत दर गुरुवारी 20:45 वाजता सुटून दुसर्या दिवशी 20:00 वाजता उधना जंक्शनला पोहोचेल.
आपल्या प्रवासात ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल स्टेशनवर थांबे घेणार आहे.
या गाडीला एकूण 22 एलएचबी कोच असतील यात संमिश्र (प्रथम एसी + 2 टाययर एसी) – 01 कोच, 2 टियर एसी – 02 कोच, 3 टायर एसी – 06 कोच, स्लीपर – 08 कोच, जनरल – 03 डबे, जनरेटर कार – 01 एसएलआर – 01. अशी कोचरचना असेल.














