चिपळूणमध्ये पिंपळी-नांदिवसे रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक विस्कळीत

चिपळूण : तालुक्यातील पिंपळी- नांदिवसे मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या संदर्भातील माहिती मिळतात संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी रवाना होत वाहतुकीला बाधा आणणारे झाड कापून मार्गातून हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.

गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. कुठेही जीवित होण्याची घटना घडली नसली तरी सामान्य जनजीवन विस्कळीत होईल अशा काही ठिकाणी घटना घडल्या आहेत. चिपळूण तालुक्यातील पिंपळी ते नांदिवसे मार्गावर पावसामुळे झाड कोसळून वाहतुकीत व्यत्यय आला होता मात्र, या घटनेची माहिती मिळतात संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर कोसळलेले झाड हटवले. आता या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

कोकणात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भंडारपळे ते गणपतीपुळे मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी जाऊ लागल्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसाचा जोर ओसरल्यानंतर ही स्थिती सामान्य झाली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE