पूर्णपणे अनारक्षित गाडीमुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा
रत्नागिरी : येत्या गणेशोत्सवात चिपळूणपर्यंत येणाऱ्या गणेश भक्तांसाठी खुशखबर आली आहे. दिवा ते चिपळूण मार्गावर दिनांक 13 सप्टेंबर पासून 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे मुंबईहून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिनांक 13 सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर 2023 या कालावधीत दिवा-चिपळूण मेमू स्पेशल गाडीच्या एकूण 36 फेऱ्या होणार आहेत.
दिवा ते चिपळूण मेमू स्पेशल 01155/01156 गाडी दिवा येथून सायंकाळी ७ वाजून 45 मिनिटांनी सुटून चिपळूणला ती रात्री एक वाजून 25 मिनिटांनी पोहोचणार आहे.
चिपळूणला आलेली मेमू स्पेशल गाडी दुसऱ्या दिवशी दिनांक 14 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दुपारी १ वाजता सुटून रात्री सात वाजता ती दिवा जंक्शनला पोहोचेल.
दिवा चिपळूण मेमू स्पेशल गाडीचे थांबे
पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड तसेच अंजनी.

दिवा ते चिपळूण ही आठ डब्यांची गाडी असेल. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे नियमित तसेच विशेष गाड्यांचे कन्फर्म आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेने रत्नागिरी पर्यंत धावणारी मेमू स्पेशल गाडी देखील जाहीर केली आहे.
हेही वाचा : Konkan Railway | गणेशोत्सवासाठी दिवा-रत्नागिरी मार्गावर यंदा प्रथमच मेमू स्पेशल धावणार!














