Goa Vande Bharat express| दीड महिना आधीच फुल्ल झाली १५ ऑगस्टची वंदे भारत एक्सप्रेस!

प्रतीक्षा यादीवर २०० च्या वर झाले बुकिंग!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर अवघ्या चारच दिवसांपूर्वी शुभारंभ झालेल्या गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकप्रियतेचा आलेख अल्प कालावधीत चढत्या क्रमाने पुढे सरकत आहे. या गाडीचे आरक्षण खुले होताच अगदी उद्घाटन होण्यापूर्वीच गणेशोत्सवातील काही तारखांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. आता दि. १५ ऑगस्टला अजून दीड महिना शिल्लक असताना मडगाव-मुंबई मार्गावरील या दिवसाची वंदे भारत एक्सप्रेस (२२२३०) मडगाव तसेच कणकवलीतूनच भरून मुंबईच्या दिशेने धावणार आहे. 15 ऑगस्टसाठी गाडीसाठी सध्या वेटिंग वरचे बुकिंग सुरू झाले आहे.

मुंबई मडगाव या कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला या मार्गावरील प्रवाशांकडून अगदी पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दि. 27 जून रोजी च्या उद्घाटन फेरीनंतर 28 जून रोजी पहिल्याच नियमित फेरीतून मध्य रेल्वेला सहा लाख 48 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दिनांक 28 रोजी झालेल्या पहिल्या फेरीला प्रवाशांकडून उत्साही प्रतिसाद लाभला. एकूण 5030 आसनांपैकी 477 इतक्या आसनांचे म्हणजे 90 इतके आरक्षण झाले होते. प्रवाशांकडून पहिल्याच दिवशी लाभलेला हा प्रतिसाद रेल्वेसाठी उत्साहवर्धक ठरला आहे.

गणेशोत्सवासाठी झाले 110% ऍडव्हान्स बुकिंग

गणेशोत्सवात मुंबईहून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येत असल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस चे आरक्षण खुले होताच बुधवारपर्यंत गणेशोत्सव कालावधीतील दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 20 सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसकरिता तब्बल 110% अगं आरक्षण झाले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीला जोडून सुट्टी घेऊन गोव्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या कालावधीत गोव्यापर्यंतच्या गाड्यांचे कन्फर्म आरक्षण मिळवताना कसरत करावी लागते. यावेळी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी वंदे भारत एक्सप्रेसचा चांगला पर्याय उपलब्ध झाल्याने पर्यटकांनी त्याचा पुरेपूर फायदा उठवला आहे. याचमुळे गोव्यातून 15 ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने येणारी वंदे भारत एक्सप्रेस दीड महिना आधीच भरली आहे. आय आर सी टी सी या रेल्वेच्या अधिकृत आरक्षण सेवा पुरवणाऱ्या संकेतस्थळावरील स्थितीनुसार 15 ऑगस्ट रोजी मडगाव तसेच कणकवली स्थानकावरूनच ही गाडी जवळपास भरून येणार आहे.

हेही वाचा : Konkan Railway | गणेशोत्सवासाठी दिवा-रत्नागिरी मार्गावर यंदा प्रथमच मेमू स्पेशल धावणार!

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE