देवरूख दि. १६ ( प्रतिनिधी ):- महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत संगमेश्वर तालुक्यातील दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी-शिवने या शाळेतील चार विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी-शिवने या विद्यालयाने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा-२०२३ मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यालयातील सानिका सुनील दळवी, स्नेहल मानसिंग वळवी, अनिषा संतोष मोर्डेकर, रसिका विनोद पालांडे यांनी जिल्हा गुणवत्ता स्थान पटकावले आहे. या विद्यार्थ्याना संदीप नटे, सौ .निलम पवार, सौ.शितल सावंत, सौ.स्मिता हर्डीकर यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विदयार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अशोक सरफरे, उपाध्यक्ष राजाराम गर्दे, उपाध्यक्ष शांताराम भुरवणे, सरचिटणीस दिलीप मोरे, सचिव शरद बाईत, संस्थासंचालक दिनेश जाधव, सचिन मोहिते, ललित लोटणकर मुख्याध्यापक प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे, सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.














