उरण दि. १८ (विठ्ठल ममताबादे ) : बदलत्या वातावरणाचा जनजीवनावर होणारा परिणाम या बाबत भावी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या हेतूने उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद डाऊरनगर शाळेत प्रकृती आणि सी. ए. सी. आर. एन. जी. ओ. यांच्या सौजन्याने इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेचे ऑगस्ट 2023 पर्यत चार भाग होतील व शेवटी मुलांची एक उत्तर चाचणी देखील घेतली जाईल अशी माहिती समन्वयक गीता म्हात्रे यांनी दिली. कार्यशाळेच्या पहिल्या भागात श्वेता आधावडे,शितल पटेल,वैष्णवी व-हाडे,यांनी हवामान व ऋतूबदल या विषयी प्रात्यक्षिका सहीत मुलांना माहिती दिली. तसेच मुलांची पूर्वचाचणी घेतली.














