लांजा : लांजा तालुक्यातील अतिवृष्टी दरडग्रस्त ११ गावातील सुमारे 180 कुटुंबाना सतर्कतेच्या आणि स्थलांतरित च्या लांजा महसूल विभागाच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, वनगुळे बौध्द वाडी येथे भूस्खलनचा धोका असल्याने येथील कुटूंब अतिवृष्टी वेळी समाज मंदिरात रात्रीच्या वेळी स्थलांतर होतात दरड ग्रस्त ठिकाणी नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अंगणवाडी ,जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी अतिजोखिम कुटुंबातील व्यवस्था करण्याचे प्रयोजन आहे लांजात आतापर्यंत सरासरी 1800 .11 मी मी पावसाची नोंद झाली आहे. लांजा तालुक्यात अतिवृष्टी मुळे किरकोळ नुकसान वगळता मोठी हानी नाही तालुक्यातील दरड ग्रस्त गावांचे भुगर्भ शास्त्रज्ञ तर्फे सर्वेक्षण करून गावे निश्चित करण्यात आली आहेत अतिवृष्टी जोखीम भागात खोरणींनको साईनगर मुसळे वाडी येथील 25 घरे, वनगुळे 5 घरे, इंदवटी 9, खावडी भोवड वाडी 15, गोळवशी तेली वाडी 20,साटवली तालये वाडी, भांडार वाडी 34,भांबेड दत्त मंदिर 1,वेरवली पाथरे वाडी 11,कुरंग 13,निवसर मुस्लिम वाडी 40,इदवंटी बाईत वाडी 2, गांगरकर कोकण रेल्वे ट्रक बोगदा शेजारी 5, कोल्हेवाडी 1, या ठिकाणी या कुटुंबाना सतर्कता आदेश देण्यात आले आहेत इंडवटी बाईत वाडी येथिल कुटुंब दुसऱ्या घरात स्थलांतर होतात इंडवटी येथे रस्ता काम करण्यात आले आहे तर खोरणींनको येथे धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे.
दरडग्रस्त गावात पालक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे साटवली सी शेळके, इंडवटी बबन जाधव, वनगुळे एकनाथ घाणेकर ,खोरनिनको ऐ लोहार, आदींची या ठिकाणी या अधिकारी यांनी गावातील यंत्रणा ,संस्था मंडळे यांच्या संपर्कात राहून यांच्या मदतीने आपत्ती कालीन वेळी अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लांजा तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे लांजा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष तहसीलदार श्री प्रमोद कदम यांनी शासकीय यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.














