अश्विन पाटील मित्र परिवारातर्फे उरणमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

उरण दि. २७ (विठ्ठल ममताबादे ) : रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान सेवा हीच ईश्वराची सेवा असे ध्येय उराशी बाळगून, गोरगरिबांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून स्वर्गीय अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे व श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या सहकार्याने उरणमधील स्वर्गीय अश्विन रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. 30 जुलै 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत उरण शहरातील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, देऊळवाडी,विमला तलाव येथे क्रीडा संकुल मधील टेरेस वर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच सनशाईन हॉस्पिटल आणि सेंटर फोर साईट यांच्या सहकार्याने डोळे तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.ज्या इच्छुक रक्त दात्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी तसेच आरोग्य शिबिराचा लाभ घ्यायचे त्यांनी नाव नोंदणीसाठी

तुषार पाटील-8976746474, गणेश पाटील-9833001393, पप्पू सूर्यराव -9821625362,मयुरेश पाटील -8850199373,सागर मसुरकर -9699267355, कौशिक भोईर -9892869291 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE