मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पूल वाहतुकीसाठी बंद

काजळी नदीच्या पुराने धोक्याची पातळीवर ओलांडल्याने निर्णय

लांजा : मुसळधार पावसाने गुरुवारी लांजा तालुक्याला झोडपले असून काजळी नदीच्या पुराने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने आंजणारी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुबंई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. लांजा पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा कडे, अडथळा उभा केला आहे. यामुळे दुतर्फा वाहतूक कोंडी झाली आहे. अतिवृष्टीमुळे पन्हळे येथे एक घर कोसळले आहे मुबंई गोवा महामार्गावर आंजणारी येथे दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे काजळी. मुचुकुंदि नदीने इशारा पातळी गाठली असून काठावरच्या घरांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शहरातही फुगी पर्या पुराचे पाणी महामार्गावर आल्याने वाहतूक कोंडी झाली आहे इंडवटी सुतार वाडी, पन्हळे आनंदगाव येथे पुराने वाहतूक कोंडी झाली आहे. वाडीचा संपर्क तुटला आहे. पन्हळे गावात सुदन इंदुलकर यांचे राहते घर रात्री कोसळून मोठे नुकसान झाले आहे. मात्र जीवित हानी नाही. श्री.सुदन शांताराम इंदुलकर वयवर्ष 45 तसेच पत्नी सौ धनश्री वयवर्ष 35 व मुलगी जुईली वयवर्ष -16 आई श्रीमती सुमित्रा वयवर्ष -80 रा. पन्हळे ता लांजा त्यांची पत्नी व आई आणि दोन मुलं असा परिवार त्यापैकी ऐक मुलगी मुंबईला असते राहत्या घराचे आडे तुटल्या करणाने घराचा धरणही मोडून पाडला असून घरातील संपूर्ण साहित्याचे नुकसान झालेले आहे. अतिशय बेताची परिस्थिती आहे. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असत. शेतीतून उत्पन्न काहीही नाही मोलमजुरी करणे हेच उत्पन्न या ठिकाणी लांजा तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी भेट दिली मध्यरात्रीपासून लांजात पावसाने जोर धरू लागला यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लांजा शहरात फुगी व्हाळाला पूर येऊन महिलाश्रम, लांजा आगार येथे वाहतूक कोंडी झाली होती. कुंभारवाडी वैभव वसाहत येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

आजणारी येथे महामार्गावर सकाळी 11 वाजता दरड कोसळली मोठे दगड माती रस्त्यावर आली होती महामार्ग बांधकाम विभाग यंत्रणा ठेकेदार यांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते. भांबेड, प्रभानवल्ली, साटवली वाकेड नदीला पूर आला होता साठवली गांगोवाडी बाजारपेठ येथे सुरक्षितता दृष्टीने धावपळ सुरू होती वाकेड रस्त्यावर झाड आडवे येऊन वाहतूक कोंडी झाली होती. लांजा तहसीलदार प्रमोद कदम आणि शासकीय यंत्रणा यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाली आहे. अनेक एसटी प्रवासी अडकले आंजणारी पूल दुपारी साडे तीन वाजता दरम्यान वाहतुकीसाठी बंद केल्याने राजापूर, लांजा, मालवण, सावंतवाडी एसटी फेरी तळवडे, कुरुचुंब दाभोळे, नाणीज मार्गाने वळविण्यात आली होती. हरचेरी, पावस आणि आंजणारी हे तीन ही मार्ग बंद झाल्याने तळवडे दाभोळे पर्यायी मार्ग खासगी, एसटी वाहतूक सुरू आहे. आंजणारी पूल येथे तहसीलदार प्रमोद कदम, पोलीस निरीक्षक घुटगुडे यांनी भेट दिली आणि परिस्थिती आढावा घेतला पोलीस तैनात आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE