मुंबई : मध्य रेल्वेच्या हद्दीत पनवेलजवळ शनिवारी मालगाडी घसरून झालेल्या अपघातामुळे रविवारी दुसऱ्या दिवशी देखील कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीतच राहिले आहे. मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर येणारी मांडवी, एलटीटी मंगळूर स्पेशल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या या कल्याण, मिरज मार्गे वळण्यात करण्यात आल्या आहेत. अन्य मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये सीएसएमटी- मंगळूर तसेच मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे
शनिवारी सायंकाळी पनवेलजवळ भरलेली मालगाडी घसरल्याने रेल्वेचे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मालगाडीला झालेल्या अपघातामुळे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यामुळे अनेक गाड्या त्यांच्या निर्धारित ठिकाणाआधीच थांबवून शॉर्ट टर्मिनेट केला जात आहे. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्यागाड्यांना देखील याचा फटका बसला आहे. शनिवारी रात्री सुटणारी कोकणकन्या एक्सप्रेस आज पहाटे सुटणार होती. मात्र तिला आणखी विलंब होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मालगाडी घसरल्यामुळे झालेल्या अपघातानंतर विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाचा विचार करता कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या गाड्यांचे लाईव्ह स्टेटस पाहून तसेच अधिक माहिती मिळवून प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पनवेल-कळंबोली विभागात मालगाडी रुळावरून घसरल्याने
अ) रद्द झालेल्या गाड्या
1) 10103 सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस
JCO 1/10/23
२) ०११६५ एलटीटी मंगळुरू एक्स्प्रेस, जेसीओ ३०/९/२३
3) 11007 सीएसएमटी पुणे एक्स्प्रेस
JCO 1/10/23
4) 11008 पुणे-सीएसएमटी एक्स्प्रेस
JCO 1/10/23
ब) या गाड्या पर्याय मार्गे वळवल्या
1) 12133 सीएसएमटी मंगळुरु एक्स्प्रेस-
JCO 30/9/23,
कल्याण- लोणावळा-पुणे- मिरज-लोंडा मार्गे
२) १२०५१ सीएसएमटी मडगाव विस्तार-
JCO 1/10/23
कल्याण- लोणावळा- पुणे- मिरज- लोंडा मार्गे वळवले
3) 12125 सीएसएमटी पुणे एक्स्प्रेस
JCO 1/10/23
लोणावळा-कर्जत-कल्याण मार्गे वळवले,
पनवेलमार्गे धावण्याऐवजी.
4) 12126 पुणे सीएसएमटी एक्स्प्रेस
JCO 1/10/23
कल्याण-कर्जत-लोणावळा मार्गे वळवले,
पनवेल मार्गे धावण्याऐवजी.
5) 17317 हुबली दादर एक्स्प्रेस-
JCO 30/9/23
लोणावळा-कर्जत-कल्याण मार्गे वळवले,
पनवेल मार्गाऐवजी.
क) अपघातामुळे गाड्यांचे वेळापत्रक
1) 20111 CSMT मडगाव एक्स्प्रेस
JCO 30/9/23
(सीएसएमटी 30/9/23 पासून नियोजित प्रस्थान 23.05 तास),
आता सीएसएमटी येथून 11.05 वाजता, 1/10/23 वाजता सुटेल
ड) या गाड्यांचा प्रवास आधीच संपणार
१) १७६१४ नांदेड पनवेल विस्तार
JCO 30/9/23,
पनवेलला येण्याऐवजी पुण्याला शॉर्ट टर्मिनेट होईल
ई) या गाड्या तात्पुरत्या इथून सुरू होणाऱ्या
१) १७६१३ पनवेल- नांदेड विस्तार-
JCO 1/10/23
पनवेल ऐवजी पुण्याहून सुटणार














