
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाची बांदा ते बोरिवली अशी बिगर वातानुकूलित व सेवा दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू करण्यात आली आहे.
एसटीची ही गाडी सावंतवाडी, कुडाळ, ओरोस, कसाल, कणकवली, नांदगाव तिठा, खारेपाटण, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, चिपळूण, भरणे नाका, पोलादपूर, महाड, माणगाव, पेण रामवाडी, पनवेल, कोकणभवन, वाशी हायवे, मैत्री पार्क, सायन, कलानगर, खार, वाकोळा, विर्लेपार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव, पुष्पा पार्क ( मालाड ) मार्गे बोरवली ला जाणार आहे.
असं आहे वेळापत्रक
बांदा येथून : संध्याकाळी ७:०० वाजता
बोरीवली वरून : संध्याकाळी ७:०० वाजता
तिकीट दर :
प्रौढ ( Adult ) : ₹ ११६९/-
बालक ( Child ) : ₹ ५८५/-
हेही वाचा : Konkan Railway | नागरकोइल- पनवेल मार्गावर उद्या विशेष गाडी धावणार!
Konkan Railway | मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा रत्नागिरी, खेडचा आरक्षण कोटा झाला दुप्पट!














