चिपळूणची सुकन्या स्नेहा रहाटेची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

चिपळूण : महाराष्ट्र स्टेट व्हेटरन्स ऍक्वाटिक असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा ऍक्वाटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वी राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धा दि.१ व २ ऑक्टोबर २०२३ रोजी संपन्न झाल्या. या राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील ३०० स्पर्धक सहभाग झाले होते. या स्पर्धा सागर पाटील जलतरण तलाव कोल्हापूर येथे अतिशय उत्साहात स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत चिपळूणची कन्या स्नेहा रहाटे सहभागी झाली होती. तिने उत्कृष्ट कामगिरी नोंदवून तिची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. तसेच तिने रत्नागिरी जिल्ह्याचे वर्चस्व कायम राखले आहे.

तिने २५-२९ वर्षे वयोगटात महिलांमध्ये फ्री स्टाईल प्रकारात
५० मी वेळ ४०:८७ से ,१०० मी वेळ १:३७ से, २०० मी वेळ ३:४१ से,४०० मी वेळ ७:५५ मीटर. वेळ नोंदवून ४ सुवर्ण पदक प्राप्त केले. ती सध्या चिपळूण रातमतीर्थ जलतरण तलाव व एस. व्ही. जे. सी. टी क्रीडा संकुलडेरवण येथे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या या यशाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

तसेच एस. व्ही. जे. सी. टी क्रीडा संकुल डेरवण चे संचालक श्री. श्रीकांत पराडकर सर प्रशिक्षक व राष्ट्रीय कोच विनायक पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

    Digi Kokan
    Author: Digi Kokan

    Leave a Comment

    READ MORE

    READ MORE