मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसामित्त आरोग्य शिबीर

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना द्रोणागिरी शहर शाखा व युवा सेना, व्यापारी असोसिएशन द्रोणागिरी नोड, फेरीवाला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना शहर शाखा द्रोणागिरी सेक्टर 50 येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी नागरिकांचे ब्लड चेकअप, शुगर चेकअप, बीपी चेकअप, एस पी ओ  2, वजन तपासणी आदी तपासणी मोफत करण्यात आले. यासाठी तेजनक्ष हॉस्पिटलचे अधिकारी कर्मचारी वर्गांचे सहकार्य लाभले.  द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर, संपर्क प्रमुख कल्पेश पाटील, शहर संघटक किसन म्हात्रे, व्यापारी असोसिएशन द्रोणागिरी नोडचे अध्यक्ष रविंद्र पाटील,उपशहर प्रमुख प्रतीक पाटील, युवा शहर प्रमुख करण पाटील, सचिव धनंजय शिंदे, फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ भोईर, द्रोणागिरी सेक्टर 50 चे शाखा प्रमुख अंकुश चव्हाण,द्रोणागिरी नोड सेक्टर 51 चे शाखा प्रमुख संजय कापसे, सेक्टर 48 चे युवा अधिकारी हितेश घरत, सागर खांडेकर, उपशाखा प्रमुख आनंद कोप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE