पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्या रत्नागिरी जिल्हा दौरा


रत्नागिरी, दि. 5 : उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.


बुधवार 6 डिसेंबर रोजी पहाटे 4.55 वाजता कोंकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. पहाटे 5.15 वाजता विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन (स्थळ : सिव्हिल हॉस्पिटल समोर, रत्नागिरी) सकाळी 9.42 वाजता सौ. प्रियांका व श्री. गजानन कमलाकर पाटील यांची सुकन्या चि. सौ. कां. प्रणाली व चि. सिध्देश्वर यांच्या शुभविवाह समारंभास उपस्थिती. (स्थळ : मराठा मैदान, हॉटेल विवेक, शासकीय विश्रामगृहासमोर, माळनाका, रत्नागिरी) दुपारी 12.29 वाजता श्री. संदिप विठ्ठल सावंत यांचे सुपुत्र चि. शुभम व चि.सौ.कां. सारिका यांच्या शुभविवाह
समारंभास उपस्थिती (स्थळ: श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, साळवी स्टॉप, नाचणे रोड, रत्नागिरी) दुपारी 12.50 वाजता नाचणे रोड, रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी विमानतळकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता रत्नागिरी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने कल्याणी हेलिपॅड, महाबळेश्वर, जि. साताराकडे प्रयाण.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE