https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव येथे ‘महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंती

0 176

रत्नागिरी : २ ऑक्टोबर : सत्य आणि अहिंसेचे पूजक आणि मार्गदर्शक, देशामध्ये राष्ट्रपिता म्हणून नावाजलेले महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती दरवर्षी दिनांक २ ऑक्टोबर रोजी देशभर साजरी केली जाते. सन २००७ साली संयुक्त राष्ट्र संघाने २ ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून घोषणा केली आहे. तसेच या दिवसाचे औचीत्त्य साधून आपला भारत देश स्वच्छ राहण्याकरिता देशभर ‘स्वच्छता मोहीम’ राबविली जाते.


डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ येथे दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘महात्मा गांधी’ आणि ‘भारताचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री’ यांची जयंती यांची साजरी करण्यात आली. त्यावेळी संशोधन केंद्र प्रमुख व , वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुरेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार प्रदान करून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अभिवादन केले. त्यानंतर प्रा. एस. बी. साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी) यांनी ‘स्वच्छता’ आणि ‘अहिंसा’ बाबतची शपथ सर्व उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला दिली.


या दिनाचे औचित्य साधून संशोधन केंद्राच्या झाडगाव प्रक्षेत्र व परिसरातील साफ-सफाई करण्याकरिता संशोधन केंद्र प्रमुख डॉ. एस.डी. नाईक यांचे मार्गदर्शन खाली ‘स्वच्छता मोहीम’ यशस्वीपणे पार पाडण्यात आली.


हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर आणि संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. 

हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता संशोधन केंद्र प्रमुख डॉ. एस.डी. नाईक यांचे मार्गदर्शन खाली डॉ. आसिफ पागारकर (सहयोगी संशोधन अधिकारी व प्राध्यापक), डॉ. हरिष धमगये (अभिरक्षक व प्राध्यापक), प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी), श्रीम. व्ही. आर. सदावर्ते (जीवशास्त्रज्ञ), श्रीम. ए.एन. सावंत (वरिष्ठ संशोधन सहाय्यक) तसेच श्री. रमेश सावर्डेकर (वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक) यांनी विशेष सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमाचे संकलन डॉ. ए.यु. पागारकर यांनी केले तर कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. एस.बी. साटम यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाकरिता श्री. मनिश शिंदे (मत्स्यालय यांत्रिक), श्री. महेश किल्लेकर (यंत्र चालक बोट), श्रीम. जे. जे. साळवी (वरिष्ठ लिपिक), श्री. डी.डी. कुबल (बोटमन), श्री. सुहास कांबळे (शिपाई), श्री. राजेंद्र कडव (शिपाई), श्री. सचिन चव्हाण (मजूर), श्री. प्रवीण गायकवाड (क्षेत्र संग्राहक), श्री. तेजस जोशी, श्री. योगेश पिलणकर, श्री. स्वप्नील आलीम, श्री. उल्हास पेडणेकर यांनी विशेष परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.