https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या डबल डेकर एक्स्प्रेसला दोन डबे वाढवले

0 77

२७ जुलैपर्यंत डबल डेकर धावणार १४ एलएचबी कोचसह
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या वातानुकूलित डबल-डेकरला 27 जुलैपर्यंत दोन डबे जोडण्यात येणार आहेत. वाढती गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी डबल-डेकर एक्सप्रेस (11085/11086 ) दिनांक 20 जून ते 27 जुलै 2022 या कालावधीत दोन वाढीव डब्यासह धावणार आहे.
याबाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार वातानुकुलित डबल-डेकरला एक एसी टू टायर तर दुसरा चेअरकार डबल-डेकर श्रेणीचा अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान ही गाडी आठवड्यातून दोन दिवस धावते.

Leave A Reply

Your email address will not be published.